Saturday, 1 December 2012
पहिल्या दिवसावर गोलंदाजांचे नाटय़मय वर्चस्व
कसोटी क्रिकेटमधील अव्वल स्थान निश्चित करणाऱ्या 'वाका' मैदानावरील तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी क्रिकेटरसिकांना नाटय़पूर्ण घडामोडींची अनुभूती घेता आली. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या फळीतील वेगवान माऱ्याने दक्षिण आफ्रिकेला रोखल्यानंतर कांगारूंचेही दोन फलंदाज दिवसअखेर तंबूत परतले होते.नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजी पसंत करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा डाव फक्त २२५ धावांत संपुष्टात आला. अॅडलेड कसोटीत पदार्पणात सर्वाचे लक्ष वेधून घेणाऱ्या फॅफ डय़ू प्लेसिसने झुंजार फलंदाजीचा प्रत्यय पर्थवरही घडविला. पण उत्तरार्धाच्या तासाभराच्या खेळात ऑस्ट्रेलियाचीही २ बाद ३३ अशी दैना उडाली होती. ईडी कोवान (०) आणि शेन वॉटसन (१०) हे फलंदाज बाद झाले असून, डेव्हिड वॉर्नर आणि नाइट वॉचमन नॅथन लिऑन अनुक्रमे १२ आणि ७ धावांवर खेळत आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment